अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने लाच व फसवणुकीचे आरोप केले आहेत. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह 7 जणांनी सौर ऊर्जा कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची (2 हजार कोटी रुपये) लाच देऊ केली होती. हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गौतम अदानी आणि सागर अदानींविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने प्रसिद्ध केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही ट्विट केले आहे.
गौतम अदानींवरील अमेरिकेतील आरोपपत्रात मोठ्या प्रमाणावर लाचखोरी आणि फसवणुकीच्या 5 गुन्ह्यांचा आरोप आहे. हे आरोप खोडून काढता न येण्यासारख्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर आधारित आहे. त्यात त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अदानी विसरले की अमेरिकेत मोदींचे राज्य नाही, जिथे ते मोदींच्या वशिल्याच्या ईडी, सेबी आणि सीबीआयवर अवलंबून राहून काहीही करून सुटू शकतात, असा टोला प्रशांत भूषण यांनी लगावला आहे.
Adanis indictment in the US is for 5 counts massive bribery & fraud; & relies on irrefutable electronic evidence. It seeks forfeiture of their properties.
Adani forgot that US is not ruled by Modi where he could rely upon a pliant ED, SEBI& CBI to get away with anything.#Modani pic.twitter.com/G0VWQyTIUW
— Prashant Bhushan (@pbhushan1) November 21, 2024