इलेक्शन ड्युटी संपवून येताना काळाची झडप:तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू, सातारा- पुणे महामार्गावर अपघात

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीची ड्युटी संपवून घरी निघालेल्या महसूल कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तलाठ्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित कदम, असं मृत तलाठ्याचं नाव आहे. सातारा पुणे महामार्गावर उडतारे (ता. वाई) गावच्या हद्दीत हा अपघात झाला. रोहित कदम हे तलाठी होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतपेट्या निवडणूक कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक होती. मतपेट्या जमा करून मध्यरात्री अडीचच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी निघाले होते. उडतारे (ता. वाई) गावच्या हद्दीत पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सातारा जावली मतदारसंघातील आनेवाडी गावात त्यांची ड्युटी होती. ते मूळचे भुईंज गावचे रहिवासी होते. मतदान केंद्राध्यक्षाला हृदयविकाराचा झटका जावली तालुक्यात आणखी एका घटनेत डांगरेघर मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्षांना हृदयविकाराचा झटका आला. मतदान केंद्रातील आशा सेविकांनी त्यांना तातडीने मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विनोद विष्णू आमले (रा. देवापूर, ता. माण), असं केंद्राध्यक्षांचं नाव आहे. दुपारच्या सुमारास हृदयविकाच्या धक्क्याने ते खाली कोसळले. आशा सेविकांनी प्रथमोपचाराने त्यांना शुध्दीवर आणून रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू सातारा जिल्ह्यातील मोरवे ( ता. खंडाळा) येथील एका व्यक्तीला मतदानकेंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरु होते. यावेळी शाम नानासाहेब धायगुडे (वय 67) हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानकेंद्रावर दाखल झाले. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर ते इव्हीएम कक्ष (मतदान यंत्र) पोहोचले. त्यांनी मतदानयंत्राचे बटण दाबले आणि याचवेळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते जागीच कोसळले. मतदान केंद्रावर कर्तव्यास असलेल्या कर्मचार्‍यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच धायगुडे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article