अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणारी तीन वाहने पकडली:महसूल विभागाकडून सहा लाखांची दंडात्मक कारवाई

2 hours ago 1
अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे तीन वाहन पकडून त्यांच्यावर सहा लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई महसूल विभागाच्या वतीने २७ व २८ नोव्हेंबर या दोन दिवसात करण्यात आली. तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार हेमंत पाटील यांना मिळाली होती. माहितीच्या आधारावर तहसीलदार यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले. त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी गवळी, कानफाडे, जाधव आणी महसूल सेवक धंदरे यांचा समावेश आहे. या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी सापळा रचून एम.एच. २८ बी.बी. ६८१४ क्रमांकाच्या वाहनाला दोन ब्रास माती घेऊन जाताना पकडले. या वेळी चालकाने पावती दाखवली. परंतु, पावतीमधील वेळेत तफावत असल्याने वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एम.एच. २८ बी.ए. ३८७५ क्रमांकाचे वाहन विनापरवाना वाळू घेऊन जाताना पकडले. त्यानंतर लगेच सकाळी साडेसहा वाजता एम.एच. २८ बी.बी. ३१०८ या वाहनाला अवैधरित्या दोन ब्रास वाळूची वाहतूक करताना पकडण्यात आले. या तीन वाहनांपैकी दोन वाहने बोराखेडी ठाण्याच्या आवारात लावण्यात आले असून एक वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहे. वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती तहसीलदार हेमंत पाटील यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article