अहिल्यानगर शहरातील ठाकरे सेनेचे 15 माजी नगरसेवक पक्षाला देणार सोडचिठ्ठी:विधानसभा निवडणुकीत थांबवलेला निर्णय मनपा निवडणुकीपूर्वी होणार
2 hours ago
1
शहरात सर्वाधिक नगरसेवक, संघटनेची ताकद असूनही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला महाविकास आघाडीची उमेदवारी नाकारण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच सुमारे पंधरा माजी नगरसेवक विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष सोडण्यास तयार झाले होते. मात्र, त्यावेळी थांबलेला निर्णय आता महापालिका निवडणुकीपूर्वी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शिवसेनेचे शहरात २३ नगरसेवक होते. राज्यात शिवसेना फुटल्यानंतर अनिल शिंदे व सुभाष लोंढे या दोघांनी शिंदे गटाला साथ दिली. उर्वरित २१ नगरसेवक ठाकरेंबरोबर राहिले. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट प्रबळ दावेदार असतानाही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली. वरिष्ठ नेत्यांनी आजतागायत त्यांची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे नाराज झालेले बहुतांशी नगरसेवक निवडणुकीपासून अलिप्त राहिले. आता निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. माजी नगरसेवकांची सोशल मीडियात बदनामी करण्याचे प्रकार सुरू झाल्याने नगरसेवकांची नाराजी उर्वरित पान ४ शहरातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी नुकतीच भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची घेतली. नाराज असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांची यापूर्वी शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली होती. आता काही नगरसेवकांची भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी जवळीक वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत माजी सभापती गणेश कवडे यांनी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना समर्थन देत उघडपणे नाराजी दाखवून दिली आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी जवळीक वाढली वरिष्ठांनी आजतागायत दाखल घेतलेली नाही ^ विधानसभा निवडणुकीत जागावाटपात नगरची हक्काची जागा सोडताना स्थानिक पातळीवर कुणालाही विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे नगरसेवक व शिवसैनिकही नाराज आहेत. निवडणुकीत शहरप्रमुख या नात्याने मविआच्या उमेदवाराच्या प्रचारात माझ्यासह काहीजण सक्रिय होते. मात्र, वरिष्ठांकडून दाखल घेतली जात नसल्याने नगरसेवक नाराज आहेत. पक्ष सोडण्याबाबत अद्याप कुणाचाही निर्णय झालेला नाही. - संभाजी कदम, शहर प्रमुख, शिवसेना ठाकरे गट.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)