आई-वडील असतानाही रतन टाटा यांना अनाथआश्रमात का पाटवलं होतं ?

2 hours ago 1

टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योगपती रतन नवल टाटा याचं 86 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झाल्याने उद्योगजगतासह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांना त्यांच्या दानशूर वृत्तीसाठी कायम लक्षात ठेवले जाईल.त्यांच्या जीवनगाथा अनेकांना मार्गदर्शन करणारी आहे. त्यांनी आपली तब्येत ठीक आहे. काळजी करण्याची गरज नाही असे सोशल मिडीयावर म्हटले होते. परंतू त्यांची प्राणज्योत काळ मालवली. त्यांच्या आयुष्यात अनेक रंजक किस्से आहेत. परंतू त्यांना खाजगी जीवनात दु:ख देखील झेलावे लागले. ते आयुष्यभर अविवाहीत राहीले.त्यांचं बालपण दुखात गेले. आई-वडील असतानाही श्रीमंत कुटुंबात जन्म झाला असताना त्यांचे बालपण अनाथाश्रमात गेले. अशी वेळ त्यांच्यावर का आली ?

आजीने पालनपोषण केले

रतन टाटा यांचं बालपण दु:खात गेले. 28 डिसेंबर 1937 मध्ये त्यांचा जन्म झाला.त्यांच्या वडीलाचं नाव नवल टाटा होतं. जेव्हा ते अवघ्या दहा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला होता. मुलाचे पालन पोषण कोण करणार यावरुन त्यांच्या पालकांत भांडण झाले. त्यानंतर आई-वडीलांनी त्यांना पेटिट पारसी अनाथालयात सोडलं. हे पाहू त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी रतन टाटा यांना वाढवले आणि त्यांचं पालनपोषण केले. त्यावेळी त्यांच्या वडीलांनी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा झाला त्यांचं नाव नोएल टाटा. रतन आणि नोएल एकत्र वाढले.

रतन टाटा यांच्या कुटुंबाचा इतिहास

1. नुस्सरवानजी टाटा (1822–1886)

हे एक पारसी धर्मगुरु होते. त्यांनी उद्योग धंद्याला सुरुवात केली. उद्योग साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली

2. जमशेदजी टाटा (1839–1904)

नुस्सरवानजी टाटा यांचे पूत्र आणि टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक मानले जाते. त्यांनीच स्टील (टाटा स्टील), हॉटेल ( ताज हॉटेल) आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी सारखे उद्योग उभारले.

3. दोराबजी टाटा (1859–1932)

जमशेदजी टाटा यांचे सर्वात मोठे पूत्र दोराबजी टाटा यांनी वडीलांच्या निधनानंतर टाटा ग्रुपचे नेतृत्व केले.त्यांनी टाटा स्टील आणि टाटा पॉवर सारखे अन्य उद्योग सुरु केले.

4. रतन टाटा (1871–1918)

जमशेदजी टाटा यांचे सर्वात धाकटे पूत्र रतन टाटा यांनी टाटा ग्रुप के कॉटन आणि टॅक्सटाईल बिजनेसचा आणखी विस्तार केला

5. जेआरडी टाटा (1904–1993)

जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे रतनजी टाटा यांचे पूत्र आहेत. त्यांनी 50 वर्षांत (1938-1991) टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. ते टाटा एयरलाईन्सचे फाऊंडर होते.त्यानंतर त्याचे रुपांतर एअर इंडियात झाले. जेआरडी टाटानी टाटा ग्रुपला मल्टीनॅशन ग्रुप बनविण्यात मोठी भूमिका निभावली.

6. नवल टाटा (1904–1989)

रतनजी टाटा यांचे दत्तक पुत्र नवल टाटा यांनी देखील टाटा ग्रुपला पुढे आणले. रतन टाटा त्यांचे पूत्र होते.

7. रतन टाटा (1937–2024)

नवल टाटा यांचे पूत्र रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये झाला. टाटा ग्रुपचा त्यांनी जगभर मोठा ब्रॅंड बनविण्यासाठी मोठे काम केले. एअर इंडिया आणि फोर्डच्या लक्झरी कार ब्रॅंड लॅंड रोव्हर जग्वॉर कंपनीला निर्माण केले. रतन टाटा यांनी 1991 ते 2012 पर्यंत 22 वर्षे टाटा ग्रुपचे चेअरमन म्हणूक काम केले. 2016 ते 2017 पर्यंत टाटा ग्रुपचे अंतरिम चेअरमन राहीले.

8. नोएल टाटा (1957)

रतन टाटा यांत्र सावत्र भाऊ नोएल टाटा टाटा ग्रुपच्या रिटेल बिजनेस ट्रेंटचे प्रेसीडेंट म्हणून काम पाहत आहेत. टाटा इंटरनॅशनल आणि अन्य टाटाचे बिजनेस त्यांनी वाढविले आहेत. टाटा ग्रुप अनेक सामाजिक आणि चॅरिटी संदर्भातील काम करीत आहे. अनेक फाऊंडेशन गरीब आणि विद्यार्थ्यांची मदत करीत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article