Nobel Prize in Literature 2024 : साहित्‍यातील नोबेल पुरस्‍कार द. कोरिया लेखिका 'हान कांग' यांना जाहीर

2 hours ago 1
मोनिका क्षीरसागर

Published on

10 Oct 2024, 11:03 am

Updated on

10 Oct 2024, 11:03 am

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नोबेल पुरस्कार समितीने आज (दि.10) साहित्य क्षेत्रातील सन्मानाची घोषणा केली. यंदाचा साहित्‍यातील नोबेल पुरस्‍कार दक्षिण कोरियाच्या साहित्यिक लेखिका 'हान कांग' यांना यांना जाहीर झाला आहे. या पुरस्‍काराची घोषणा रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने केली. (Nobel Prize in Literature 2024)

BREAKING NEWS
The 2024 #NobelPrize in Literature is awarded to the South Korean author Han Kang “for her intense poetic prose that confronts historical traumas and exposes the fragility of human life.” pic.twitter.com/dAQiXnm11z

— The Nobel Prize (@NobelPrize) October 10, 2024

२०२३ चा साहित्यनोबेल जॉन फॉसे यांना झाला होता जाहीर

गेल्यावर्षीचे साहित्यातील नोबेल पुरस्‍कार नॉर्वेचे साहित्यिक जॉन फॉसे यांना जाहीर झाला होता. अनेक नाविन्यपूर्ण नाटक आणि गद्यासाठी त्‍यांनी दिलेल्‍या याेगदानाबद्‍दल त्यांना साहित्यातील सर्वोच्च पारितोषिक प्रदान करण्‍यात आले होते. नॉर्वेचे रहिवाशी असलेले फॉसे यांनी अनेक नाटक, कादंबरी, कविता संग्रह, निबंध, लहान मुलांची पुस्तके त्यांच्या भाषेत लिहले आहेत. तसेच त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद देखील केला आहे.

साहित्य क्षेत्रात ११६ नोबेल पारितोषिकांचे वितरण

सन १९०१ ते २०२२ पर्यंत साहित्यातील ११५ नोबेल पारितोषिक, ११९ व्यक्तिंना
रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्यावतीने १९०१ पासून आत्तापर्यंत साहित्य क्षेत्रात ११६ नोबेल पारितोषिक देण्यात आले. सन १९०१ ते २०२२ मध्ये ११९ व्यक्तींना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. यामध्ये १७ महिला, ४१ युवक आणि ८८ वयोवृद्ध साहित्यिकांना साहित्यातील नोबेल देण्यात आले होते. दरम्यान १९१४, १९१८, १९३५, १९४०, १९४१, १९४२, आणि १९४३ या सात वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आले नव्हते. नोबेल फाउंडेशनच्या नियमांनुसार, जर कोणताही शोध निर्धारित निकषांमध्ये बसला नाही, तर परितोषिकाची रक्कम पुढील वर्षापर्यंत राखून ठेवली जाते. पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात कमी नोबेल पारितोषिके देण्यात आली होती.

Nobel Prize in Literature 2024 : यंदाचे जाहीर नोबेल पुरस्‍कार

यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या (Physiology) नोबेल पुरस्कार ( Nobel Prize) अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन rh'dh मायक्रो आरएनएच्या शोधासाठी जाहीर झाला आहे. फिजिक्स (पदार्थविज्ञान) नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना ‘कृत्रिम न्यूरल नेटवर्कसह मशीन शिक्षण सक्षम करणाऱ्या पायाभूत शोधांसाठी’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने २०२४ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना संयुक्तपणे जाहीर केले आहे. डेव्हिड बेकर यांना 'कॉम्प्युटेशनल प्रोटीन डिझाइन'साठी आणि डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना संयुक्तपणे 'प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन" संशोधनासाठी नोबेल पुरस्‍काराने गौरवले आहे. (Nobel Prize 2024)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article