भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची प्रकृती खालावली:एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवले, काही दिवसांपूर्वी झाली होती अँजिओप्लास्टी

2 hours ago 1
भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रकृती गुरुवारी अचानक खालावली. त्यामुळे त्यांना हवाई रुग्णवाहिकीने तातडीने मुंबईला हलवण्यात येत आहे. मुटकुळे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाली होती हे विशेष. तानाजी मुटकुळे हे भाजपचे हिंगोली मतदारसंघाचे आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. पण गुरुवारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात येत आहे. त्यांना घेऊन येणारी रुग्णवाहिका गुरुवारी सायंकाळी नांदेड विमानतळावर पोहोचली. त्यानंतर तेथून त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात येणार आहे. मुटकुळे यांचा 10 वर्षांपासून मतदारसंघावर वरचष्मा आमदार तानाजी मुटकुळे हे मागील 10 वर्षांपासून हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. 2005 ते 2009 पर्यंत भाजपची येथील पक्षसंघटना मजबूत करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. 2009 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा काँग्रेस उमेदवार भाऊराव बाबूराव पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर 2024 मध्ये ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले. पण काँग्रेसच्या राजीव सातव यांनी त्यांचा पराभव केला. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीपासून दूर पण यंदा तानाजी मुटकुळे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीच्या समरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याजागी त्यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पण येथून सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील सुमठानकर व डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर या दोन्ही इच्छुकांनी मतदारसंघातील दौरेही वाढवले आहेत. त्यामुळे हिंगोली विधासनभा मतदारसंघात भाजप कुणाला संधी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे ही वाचा... देवेंद्र फडणवीस हे 50 गद्दारांचे शिलेदार:प्रणिती शिंदे यांचा तिखट पलटवार; म्हणाल्या - महिला पराभव करते, तेव्हा भाजपवाले संतापतात सोलापूर - काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस हे 50 गद्दारांचे शिलेदार आहेत. एका महिलेने पराभव केल्यामुळे खरेच भाजपवाले संतापतात. त्यानंतर ते कोणत्याही लाडक्या बहिणीचा मानसन्मान ठेवत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर कॅबिनेटच्या बैठकीत विक्रमी 80 निर्णय:नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 वरून 15 लाख, पत्रकारांसाठी महामंडळ; मराठा आरक्षणाला बगल मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विक्रमी 80 निर्णय घेतलेत. यात सरकारने नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख केली असून, लेवा पाटील समाज महामंडळ, संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्तावही हातावेगळा केला आहे. विशेषतः पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठीही सरकारने 2 स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article