आग लागताच एकापाठोपाठ एक 15 सिलेंडरचा धाड धाड स्फोट, ठाणे हादरले; अग्नितांडव सुरूच

2 hours ago 1

ठाण्यात आगीची मोठी घटना घडली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका कंपनीला ही आग लागली आहे. संबंधित कंपनीला आग लागताच एकापाठोपाठ एक अशा तब्बल 15 सिलेंडरचा धाड धाड स्फोट झाल्याचा आवाज परिसरात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. आग नेमकी कशामुळे लागली? ते अद्याप समजू शकलेली नाही. पण गेल्या तीन तासांपासून ही आग धुमसत आहे. या आगीत कितपत नुकसान झालं आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. आगीत कुणी जखमी झाले आहे का? याबाबतची माहिती देखील अद्याप समजू शकलेली नाही. पण आगीत संबंधित कंपनी जळून खाक होताना दिसत आहे. आगीमुळे धुरांचे मोठमोठे लोळ हवेत मिसळताना दिसत आहे. हे लोळ पाहिल्यानंतर आग किती भीषण आहे याचा प्रत्यय येतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात वागळे इस्टेट परिसरात असणाऱ्या एका चिप्सच्या कंपनीला ही आग लागली आहे. व्यंकट रमण फूड कंपनी असं या कंपनीतं नाव आहे. या कंपनीत चिप्स आणि कुरकुरे निर्माण केले जातात. या कंपनीत वेफर आणि पुठ्ठ्यांना आग लागली आहे. ही आग प्रचंड भडकली आहे. आग लागल्यानंतर एकापाठोपाठ तब्बल 15 सिलेंडरच्या स्फोटाचे आवाज आहे. त्यामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विजवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण आग विजवण्यात अद्यापही यश आलेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत 10 अग्निशमन बंब आणि 8 टँकर घटनास्थळी आणण्यात आले आहेत. पण आग विजायचं नाव घेताना दिसत नाहीय. त्यामुळे परिसरातील नागरीकदेखील भयभीत झाले आहेत.

अग्निशामक दलाच्या जवानांकडून गेल्या तीन तासांपासून आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मीरा रोड, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण शहरातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेचं गांभीर्य ओळखून आणि संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी आगीच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे. तसेच विद्युत लाईन देखील बंद ठेवण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article