आगम हे धार्मिक, आध्यात्मिक ग्रंथ नसून,ते प्रत्येक जैन धर्मीयाचा प्राण:जैन साध्वी चंद्रकलाश्रीजी यांचे प्रतिपादन, पाथर्डीत जैन आगम यात्रा उत्साहात

1 day ago 1
जैन धर्मियांसाठी आगम केवळ धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथ नसून, ते प्रत्येक जैन धर्मीयांचा प्राण आहे. त्यातील श्रीमद उत्तराध्यायन सूत्र हे भगवान महावीरांची अंतिम वाणी आहे. सनातन परंपरेत श्रीमद्भागवत गीतेला, शिख परंपरेत गुरु ग्रंथसाहिब, ख्रिस्ती परंपरेत बायबल, तर इस्लाममध्ये कुराण शरीफला जे स्थान आहे, तेच स्थान जैन धर्मात श्री उत्तराध्यायन सूत्र व इतर आगमाला असल्याचे प्रतिपादन जैन साध्वी उपप्रवर्तिणी चंद्रकलाश्रीजी यांनी केले. जैन साध्वी स्नेहाश्रीजी व श्रुतप्रज्ञाश्रीजी यांच्या प्रेरणेने पाथर्डी श्रावक संघाच्या वतीने राष्ट्रसंत आनंदॠषीजींच्या पावनभूमीत प्रथमच जैन आगम यात्रा काढण्यात आली. या रॅलीमुळे जैन धर्म स्थानक व शहरातील वातावरण श्रद्धामय व भक्तिमय झाले होते. महिला व पुरुषांच्या हाती विविध संदेश असलेले फलकही होते. रॅलीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भगवान महावीर स्वामी व जैन धर्माच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. नंतर सजवलेल्या आगमाचे प्रदर्शन भरवण्यात आले. या आगम बत्तीसी रॅलीत जैन श्रावक संघ, प्रतिभा बहू मंडळ, सुविधी बहु मंडळ, जैन युथ फेडरेशन, लाभार्थी चोरडिया परिवारासह शेकडो जैन बांधव सहभागी झाले होते. धर्मसभेला संबोधित करताना साध्वी म्हणाल्या की, भगवान महावीरांनी सांगितलेले विचार आणि शब्द आपल्या हातात आहेत, आपल्या डोक्यावर आहेत, आपल्या जिभेवर आहेत. ज्या भक्तिभावाने तुम्ही इथे आलात, ते तुमचे भाग्य आहे. तुमच्या सौभाग्याचे कौतुक करताना विचार करा, की आज तुमच्याकडे जगातील सर्व संपत्ती आहे, महावीरांच्या शब्दांची संपत्ती आहे. ही संपत्ती तुम्हाला तुम्हाला सिद्धांच्या श्रेणीत बसवते. जैन तत्त्वज्ञानाचा पाया ३२ आगमामध्ये आहे. जो आगम शिकतो आणि ऐकतो त्याच्या आयुष्यात आनंद येतो. आगम आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवते. धार्मिकता कधीही हरू शकत नाही. अधर्म कधीही जिंकू शकत नाही. यावेळी नवपद आराधनेचा भाग म्हणून श्रीपाल-मैनासुंदरी चरित्राचे पठण केले. प्रखर वक्त्या साध्वी स्नेहाश्रीजी यांनी भव्य आगम रॅली काढल्याबद्दल श्री संघासह लाभार्थी चोरडिया परिवाराचे आभार मानले. यावेळी विविध पारितोषिके देण्यात आली. महासती चंद्रकलाश्रीजी यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तिलोक जैन संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी परिवाराच्या वतीने साध्वीजींना उत्तराध्ययन सूत्र सोपवण्यात आले. मनीष गुगळे, सोनू गुगळे, विजय लुणावत, सचिन चोरडिया, कांतीलाल गुगळे यांच्या वतीने सर्वांना प्रभावना देण्यात आली. रॅलीत ३२ जोडपी सहभागी यात्रेची सुरुवात श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया यांच्या निवासस्थानापासून साध्वीजींच्या मंगल पाठाने झाली. क्रांती चौक, नवी पेठ, आंबेडकर चौक, नाईक चौक, अजंठा चौक, मेन रोड मार्गे संपूर्ण शहरात धर्मप्रसार करीत ही यात्रा स्थानकात पोहोचल्यावर या रॅलीचे स्वागत करण्यात आले. या रॅलीत ३२ जोडपी ३२ आगमाचे शास्त्र डोक्यावर घेऊन चालत होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article