मनोज जरांगे-पाटील Pudhari File Photo
Published on
:
12 Oct 2024, 8:44 am
Updated on
:
12 Oct 2024, 8:44 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : आचारसंहिता लागण्याआधी सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा सरकारला उलथं केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा दिला आहे. बीडजवळील नारायणगडावर जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा दसरा मेळावा प्रथमच झाला. यावेळी ते बोलत होते. अचार संहिता लागल्यावर मुख्य भूमिका मांडणार असल्याचेही यावेळी जरांगे यांनी सांगितले.