आदर्श शिक्षकांच्या वेतनवाढीकरीता जि.प.च्या सामान्य निधीत तरतुद करा:राज्य शासनाचे आदेश, अद्याप अंमलबजावणी केली नसल्याने नाराजी
2 hours ago
2
जिल्हा स्तरावर आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षकांना वेतनवाढ देण्यासाठीची तरतूद सामान्य निधीतून केली जावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेत हे निर्देश देण्यात आले आहेत. या विभागाच्या उपसचिव नीला रानडे यांची त्यावर स्वाक्षरी आहे. या अधिसूचनेनुसार २०१८ सालापर्यंत ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यांना वेतनवाढ देण्याची तरतूद केली जावी, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशानुसार अंमलबजावणीचे निर्देश यापूर्वीही देण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही, अशी शासनाची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य निधीतून ही तरतूद केली जावी, असे निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. जिल्हा स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना वेतनवाढ दिली जायची. परंतु दरम्यानच्या काळात ती बंद करण्यात आली होती. त्या निर्णयाला काही शिक्षकांनी आव्हान दिले होते. त्यानुसार न्यायालयाने शासनाला निर्देश दिले, अशी संबंधित शिक्षकांची माहिती आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)