देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय?; संजय राऊत म्हणाले…

2 hours ago 2

Sanjay Raut connected Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय?; संजय राऊत म्हणाले...

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय?; संजय राऊत म्हणाले...

देवेंद्र फडणवीस, संजय राऊतImage Credit source: ANI

| Updated on: Nov 28, 2024 | 9:58 AM

मुख्यमंत्री कोण हे आणखी ठरत नाही. 200 पेक्षा जास्त जागा येऊन पण मुख्यमंत्री ठरत नाही. भाजपला पूर्ण बहुमत असताना राज्याचं मुख्यमंत्री पद का लटकून पडल आहे हे जनतेला समजत नाही. आम्ही आजही मानत नाही की हा जनतेचा कौल आहे. राज्यात नियम कायदे हे फक्त विरोधी पक्षासाठी आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा कसा असू शकतो हेच समजत नाही. शिवसेना स्वतःला समजनाऱ्यानी पक्षाचे निर्णय दिल्लीतील नेत्यांना दिले असतील. तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचे आधिकर नाहीत. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिल्लीला दिल्यामुळे दिल्ली ठरवेल की राज्य कोणाच्या हाती द्यायचं, असं संजय राऊत म्हणालेत.

महाविकास आघाडी अजिबात फुटणार नाही. आम्हाला तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. काही कार्यकर्त्यांची वेगळ लढवी अशी भूमिका असते. लोकसभेला एकत्र लढलो त्याचा फायदा झाला, विधानसभेला का फायदा झालं नाही हे एकत्र बसून ठरवू. भविष्याचा विचार करता आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. हे जिंकले त्यांची ही भूमिका नाही. जे पराभूत झाले आहेत त्यांना अस वाटणं चूक नाही. भविष्यात काय होईल ते बघू, असं राऊत म्हणालेत.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article