132 आमदारांमुळे भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक:विरोधकांनी EVM वर पराभवाचे खापर फोडले- छगन भुजबळ
2 hours ago
2
132 आमदारांमुळे भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे.तर EVM मशीनवर विरोधकांनी घेतलेल्या संशयावर बोलताना भुजबळ म्हणाले की, मला 2019 साली 56 हजारांहून जास्त लीड होते, ते यावेळी कसे कमी झाले. जर तसे असते तर माझे लीड वाढले असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या मतदारसंघात 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. पण मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मतदानाच्या अधल्या रात्री दोन वाजेपर्यंत लोकांच्या भेटी घेतल्या त्यांनामला मतदान करु नका अशी साद घातली, यामुळे मला एका मोठ्यावर्गाने मतदान केले नाही अन् मला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. विरोधकांनी EVM वर खापर फोडले छगन भुजबळ म्हणाले की, EVM मध्ये जर गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला मोठे मताधिक्य मिळायले हवे होते. पराभवाचे खापर फोडण्यासाठी कुणाची तरी गरज असते. विरोधकांनी यावेळी EVM वर खापर फोडले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगले मतदान झाले तेव्हा असे काहीच ते म्हणाले नाही,असा टोलाही भुजबळांनी मविआला लगावला आहे. 27 हजार मतांनी विजयी येवल्यातून अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळांना तर शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली होती. यावेळी माणिकराव शिंदे यांनी जवळपास लाखभर मते घेतल्याने भुजबळांना ही निवडणूक अवघड गेली होती. या निवडणुकीत 27 हजार मतांनी त्यांनी शिंदेंचा पराभवकेला होता. मनोज जरांगे पाटील यांचया विरोधानंतर त्यांच्या विजयामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी शायरी बाद मैं करेंगे, शेर तो आ गया है, म्हणत जरांगेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)