आधार सिडिंगअभावी 75,211 लाडक्या बहिणींचे पैसे अद्यापही जमा झाले नाही:प्रतीक्षेतील महिलांना नव्या सरकारमध्ये मिळणार लाभ

2 hours ago 1
जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत ७ लाख १६,९०५ लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले आहेत. यामधून ६ लाख ९९,७१६ अर्ज मंजूर केले तर ७५,२११ लाडक्या बहिणींचे आधार सिडिंग न झाल्याने त्यांचे अद्यापही पैसे जमा झाले नाही. याशिवाय १०,३३० अर्ज पडताळणीत आहे. अशातच आता मंगळवारी दुपारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे प्रतीक्षेतील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात २३ नोव्हेंबरनंतरच अनुदान जमा होणार आहे. सोबतच आता नव्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये नारीशक्ती अॅपवर ३ लाख ९८,३४१ महिलांनी अर्ज केले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या पोर्टलवरून ३ लाख १०४२ महिलांनी पुन्हा या योजनेकरिता नोंदणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १६,९०५ महिलांनी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज केले आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख ९९,७१६ महिलांचे अर्ज मंजूर केले आहे. यापैकी ४,३६३ महिलांचे अर्ज फेटाळले आहे. तर १०,३३० हजारांवर अर्ज पडताळणीत आहे. अशातच जिल्ह्यात अद्यापही ७५,२११ महिलांचे आधारकार्ड बँकेला संलग्न नसल्याने त्यांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे त्यांचे सिडिंग झाल्यानंतर बँक प्रक्रियेतील अनुदान त्या लाभार्थ्यांना प्राप्त होईल. परंतु, नव्याने अर्ज करणे व पुढील टप्पा याशिवाय त्रुटीत असलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेला मात्र आचारसंहितेमुळे आता ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेतील अनुदान प्राप्त होईल की योजना बंद होईल. याकडे लक्ष लागणार आहे. तालुका एकूण अर्ज मंजूर या क्रमाने ः अमरावती १८५३७५- १७७४८२, भातकुली २७६७६ - २६८४८, धारणी ५१०७७- ४९९१५ चांदूर बाजार ४६७५७ - ४६०५५, अंजनगाव सूर्जी ४१२४५ - ४०४९१, धामणगाव रेल्वे ३२७९६ - ३२४३५, नांदगाव खंडे. ३१९३४- ३१७६७, दर्यापूर ४४०९४- ४३१६६, अचलपूर ७०८५२- ६९२८०, चिखलदरा ३१९५४ - ३१२२६, तिवसा २७५३५ - २७१९२ चांदुर रेल्वे २२९०९- २२४९५, मोर्शी ४६७९८- ४६१११, वरूड ५५९०३ - ५५२५३, एकूण ७१६९०५ - ६९९७१६

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article