'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपट यादिवशी भेटीला येणार आहे instagram
Published on
:
10 Oct 2024, 1:31 pm
Updated on
:
10 Oct 2024, 1:31 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क - राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. "कर्मयोगी आबासाहेब" असं नाव असलेल्या या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. आबासाहेबांच्या आयुष्याविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही जगभर रिलीज होत आहे.
मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घन:श्याम दरोडे, अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख, प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.