अजितदादा यांच्यामुळे एकनाथ शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत अजितदादा त्यांच्या ठिकाणी आहे. आम्ही आमच्या ठिकाणी आहोत असे उत्तर दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाचा निकाल येऊन चार दिवस झाले तरीही महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. यास महायुतीतील घटक पक्ष एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्त दिलेले आहे. संजय राऊत यांनी जनतेचा गृहीत धरले होते. आता विरोधकांकडे रडत बसण्याशिवाय दुसरं काम नाही. असं कसं झालं, क्या से क्या हो गया, असे सगळे डायलॉग आता ते पाठ करत बसतील. करावे तसे भरावे हे आता विरोधकांच्या नशिबी आलेले आहे. आधी आमचे बेकायदेशीर सरकार म्हणत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार याची आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त चिंता लागली आहे असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी महायुतीच्या तंगड्यात – तंगड्या अडकल्या आहेत. म्हणून २६ तारीख उलटली तरी सरकार स्थापन झालेले नाही अशी टीका केली आहे. त्यावर आमच्या कोणच्याही तंगड्या अडकलेल्या आहेत. सर्व निवांत आहेत. सरकार लवकरच दोन-चार दिवसात स्थापन होईल असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
Published on: Nov 27, 2024 12:36 PM