आमदार अमित गोरखेंना मंत्री करा; दलित महासंघाची मागणी:बावनकुळे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अवघडे यांची मागणी
2 hours ago
1
आमदार अमित गोरखे यांना येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळात मातंग समाजाचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिपद द्यावे, अशी मागणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे (बार्शी) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती, उच्च विद्या विभूषित व मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार गोरखे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यावर त्यांनी बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात दौरा करून भाजप व महायुतीच्या विरोधातील समाजाचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुण्यातील राष्ट्रीय स्मारक, मुंबईतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, मातंग समाज शिक्षित व्हावा म्हणून अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरची केलेली सुरुवात तसेच आरक्षणातील अ ब क ड वर्गवारीचा घेतलेला निर्णय यासाठी भाजप व महायुती सरकारने केलेली कामे समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे कामही केले. या पार्श्वभूमीवर युवा आमदार गोरखे यांनी अल्पावधीत पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाची योग्य दखल घेत गोरखे यांना राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)