आरोग्यविषयक कामकाजाबाबत बागलाण तालुका जिल्ह्यात द्वितीय:जिल्ह्याच्या आरोग्यविषयक निर्देशांक आढाव्यात तालुक्याची निवड
3 hours ago
1
बागलाण तालुक्याचा आरोग्य विषयक कामकाजात जिल्ह्यात दुसरा क्रमांक आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षलकुमार महाजन यांचा सन्मान करण्यात आला. बुधवारी (दि. २९) झालेल्या जिल्ह्याच्या आरोग्य विषयक निर्देशांक आढाव्यात जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी बागलाणचा दुसरा क्रमांक आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षलकुमार महाजन यांनी दिली. आढावा बैठकीत जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रँकिंग देण्यात आले. यात बागलाण तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पहिल्या ५० मध्ये समावेश आहे. आढावा सभेस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गरोदर माता नोंदणी ७९ टक्के, १२ आठवड्याच्या आत गरोदर नोंदणी ८५ टक्के, ४ वेळा गरोदर माता तपासणी ८८ टक्के, लसीकरण पूर्ण झालेल्या बालकांची संख्या - ८३ टक्के, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया - ७३ टक्के, आशाताईमार्फत एचबीएनसी आणि एचबीवायसी गृहभेटी - ९५ टक्के
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)