माझा आणि जाहीर सभेतील पावसाचा काहीतरी संबंध : शरद पवारFile Photo
Published on
:
15 Nov 2024, 10:23 am
Updated on
:
15 Nov 2024, 10:23 am
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभेचे आज इचलकरंजीत आयोजन करण्यात आले होते. या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि लोक जमा झाले होते. दरम्यान शरद पवार यांच्या सभेला सुरूवात होताच अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, माझा आणि जाहीर सभेतील पावसाचा काहीतरी संबंध आहे. मी बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते. मात्र या पावसानंतर निवडणुकीचा निकालही चांगला लागतो असे ते म्हणाले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. (Sharad Pawar)
यानंतर शरद पवार यांनी आपले भाषण थोडक्यात संपवलं. मात्र यामुळे शरद पवार यांच्या २०१९ च्या साताऱ्यातील जाहीर सभेची आठवण झाली. शरद पवार यांच्या गेल्या विधानसभेच्या निवडनुकीत साताऱ्यातील जाहीर सभेवेळी असाच जोरदार पाउस सुरू झाला. मात्र शरद पवार यांनी आपले भाषण न थांबवता तसेच सुरू ठेवले. यावेळी उपस्थित जनसमुदायही जागेवरच पावसात थांबुन भाषण ऐकत होता. यानंतर या सभेची मोठी चर्चा झाली होती.