इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांचा चीनला मोठा धक्का, भारतासाठी मोठी घोषणा

2 days ago 2

India Italy Deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी ब्राझीलमध्ये G-20 शिखर परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत भारत आणि इटली यांच्यातील 5 वर्षांच्या 2025-29 च्या कृती आराखड्याची रणनीती तयार करण्यात आली. जॉर्जिया मेलोनी यांनी भारताबाबत एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलंय. आणि लिहिले आहे की, आम्ही 2025 ते 2029 साठी एक संयुक्त धोरणात्मक कृती योजना बनवली आहे. भारत आणि इटली यांच्यातील या योजनेमुळे चीनला मोठा धक्का बसला आहे.

मेलोनी यांनी लिहिले की, भारतासोबतची त्यांची मैत्री सतत वाढत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सकारात्म असते. आगामी काळात भारत आणि इटली यांच्यातील भागीदारीची आशा आहे. आम्ही विविध क्षेत्रात एकत्र काम करण्यास तयार आहोत. आम्ही 2025 ते 2029 साठी संयुक्त धोरणात्मक कृती योजना देखील जाहीर केली.

भारत-इटली कृती योजनेमध्ये आर्थिक सहकार्य, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, अंतराळ योजना, संरक्षण, सुरक्षा, स्थलांतर कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता याचा समावेश आहे. इटली आणि भारत या नवीन गोष्टींसाठी एकत्र काम करण्यास पूर्णपणे तयार आहेत. मेलोनी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मला खूप आनंद झाला. हा संवाद, जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने देखील, एक मौल्यवान संधी आहे ज्यामध्ये आपण 2025-29 साठी व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये संयुक्त धोरणात्मक कृती योजना जाहीर करू शकतो. स्वच्छ ऊर्जा, अंतराळ, संरक्षण आणि कनेक्टिव्हिटी भारताने इटलीला सामायिक भागीदारी पुढे नेण्यासाठी आपल्या सामायिक वचनबद्धतेची पुष्टी करण्याची परवानगी दिली आहे.

Sempre un grande piacere incontrare il Primo Ministro indiano, @narendramodi, anche successful questa occasione del Vertice G20 a Rio de Janeiro.

Una preziosa opportunità di dialogo che ci ha permesso di ribadire il comune impegno per acold avanzare il partenariato strategico… pic.twitter.com/3dpiJ6J65M

— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) November 18, 2024

भारत-इटली संबंध अधिक घट्ट होत आहेत

मेलोनी म्हणाल्या की, “आम्ही दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या फायद्यासाठी आणि लोकशाही, कायद्याचे राज्य आणि शाश्वत विकासाच्या सामायिक मूल्यांच्या समर्थनासाठी द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करत राहणार आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी हे ट्विट केले आहे. गेल्या दोन वर्षांत इटली आणि भारत यांच्यातील व्यापार किती जवळ आला आहे हे दर्शविते. त्यांच्यातील संबंध अधिक घट्ट झाले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article