इस्रायल संरक्षण दलाने गुरुवारी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासच्या तीन वरिष्ठ नेत्यांच्या हत्येची पुष्टी केली आहे.(Image source- Israel Defense Force)
Published on
:
03 Oct 2024, 10:55 am
Updated on
:
03 Oct 2024, 10:55 am
पुढारी ऑनलाईन डेस्क
इस्रायल संरक्षण दलाने (IDF) गुरुवारी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासच्या तीन वरिष्ठ नेत्यांच्या हत्येची पुष्टी केली. यात गाझा सरकारचा प्रमुख रावही मुश्ताहा यांचा समावेश आहे. या कारवाईबाबत अधिक माहिती देताना आयडीएफने सांगितले की उत्तर गाझामधील भूमिगत कंपाऊंडवर केलेल्या हल्ल्यात रावही मुश्ताहा याच्यासह समेह सिराज आणि समेह ओदेह हे दोन हमास कमांडर ठार झाले. यावर हमासने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Approximately 3 months ago, in a joint IDF and ISA strike in Gaza, the following terrorists were eliminated:
🔴Rawhi Mushtaha, the Head of the Hamas government in Gaza
🔴Sameh al-Siraj, who held the security portfolio on Hamas' political bureau and Hamas' Labor Committee
🔴Sami… pic.twitter.com/6xpH6tOOot