उत्तर प्रदेशातील संभलमध्ये रविवारी सकाळी मुघलकालीन जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली. दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष उफाळला. काही वेळातच जमावाने सात वाहने पेटवली. मुरादाबादचे विभागीय आयुक्त अंजनेय कुमार सिंह म्हणाले की, नईम, बिलाल आणि नौमन अशा तिघांचा हिंसाचारात मृत्यू झाला. दगडफेकीत २० पोलिसही जखमी झाले. पोलिसांनी दोन महिलांसह १० जणांना ताब्यात घेतले. कोर्टाच्या आदेशावरून शाही मशिदीच्या सर्व्हेसाठी ॲडव्होकेट कमिशनरच्या नेतृत्वातील पथक रविवारी सकाळी सात वाजता उर्वरित. पान २ दावा : ही जामा मशीद नाही, तर हरिहर मंदिर कैलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी महाराज यांनी संभलची शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा केला होता. हे हिंदू मंदिराजागी बाबर काळात बांधले गेले. त्यांनी दिवाणी कोर्टाकडे सर्वेक्षणाची मागणी केली होती. कोर्टाने रमेशसिंग राघव यांची अधिवक्ता आयुक्त म्हणून नियुक्ती करून १५ दिवसांत सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी सांगितले. अहवाल २९ नोव्हेंबरला सादर केला जाईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)