Maharashtra Election Results 2024 : ‘या’ जागांवर सर्वाधिक धक्कादायक निकाल, सर्वात कमी मतांनी कोण हरलं ?; कोणाचा मोठा विजय ?

2 hours ago 1

Maharashtra Assembly Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे शनिवारी निकाल आले आणि अनेकांना धक्का बसला. मतदारांनी पुन्हा कौल दिल्याने महायुतीचा दणदणीत विजय झाला. महायुतीने 236 जागांववर विजय मिळाला असून भाजपला सर्वाधिक 132 तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. या निकालानंतर आता सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू असून लवकरत मुख्यमंत्रीपदाची घोषणा होऊ शकते. सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी या निवडणुकीतील अनेक निकांलाच बऱ्याचा जणांना धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत अनेकांना मोठा धक्का बसला असून त्याची बरीच चर्चा सुरू आहे.

खरंतर काही जागांवर उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले तर काही जागा अशा आहेत की जिथे एकतर्फी लढत दिसली आणि विरोधक मोठ्या फरकाने पराभूत झाले. या निवडणुकीत कुठे काय घडलं जाणून घेऊया. अशाच काही जागांवर नजर टाकूया.

या उमेदवारांचा निसटता विजय

1. मालेगांव मध्य

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खालिक यांना सर्वात कमी मतांनी विजय मिळला आहे. त्यांनी ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र’ चे उमेदवार आसिफ शेख रशीद यांचा अवघ्या 162 मतांच्या फरकाने पराभव केला.

2. साकोली

काँग्रेसचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष नाना पटोले हे सर्वात कमी मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा २०८ मतांनी पराभव केला.

3. बेलापूर

बेलापूर विधानसभेची जागाही अशा जागांपैकी एक आहे जिथे विजयाचे अंतर खूपच कमी होते. नवी मुंबईतील या जागेवरून भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे 377 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप गणेश नाईक यांचा पराभव केला.

4. बुलढाणा

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे गायकवाड संजय रामभाऊ यांनी शिवसेनेच्या उद्धव गटाच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांचा 841 मतांनी पराभव केला.

5. नवापुर

नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक यांनी अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांचा 1,121 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

सर्वात मोठा विजय कोणाचा?

– शिरपूर येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आशिराम वेचन पावरा यांनी 1,45,944 मतांच्या फरकाने विजय मिळवून या निवडणुकीत सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम केला आहे.

– साताऱ्यातून भाजपचे शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 1,42,124 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली.

– परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 1,40,224 मतांनी विजयी झाले.

– बागलानमधून भाजपचे दिलीप मंगलू बोरसे चौथ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी 129297 मतांनी निवडणूक जिंकली.

– कोपरगावमधून राष्ट्रवादीचे आशुतोष अशोकराव काळे 1,24, 624 मतांनी विजयी झाले.

– कोपरी – पाचपाखाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1,20,717 मतांनी विजयी झाले.

– कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील 1,12,041 मतांनी विजयी झाले.

– चिंचवडमधून भारतीय जनता पक्षाचे जगताप शंकर पांडुरंग 1,03,865 मतांनी विजयी झाले.

– बोरिवलीतून भाजपचे संजय उपाध्याय 1,00,257 मतांनी विजयी झाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article