फडणवीस BJP अध्यक्ष झाल्यास CM कोण?:विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांची नावे शर्यतीत; राष्ट्रवादीने सूचवला 2-2-1 चा फॉर्म्युला?
1 hour ago
1
विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील, त्यानंतर हे पद शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवले जाईल. पण फडणवीस यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे होण्यापूर्वीच भाजप अध्यक्ष बनवण्यात आले, तर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून मुख्यमंत्रीपदाची माळ भाजप नेते विनोद तावडे किंवा चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात घातली जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यात भाजपच्या पारड्यात सर्वाधिक 132 जागा गेल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41जागा मिळाल्या. दुसरीकडे, काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीची या निवडणुकीत प्रचंड हाराकिरी झाली. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. सपच्या खिशात 2, तर इतर पक्ष व अपक्षांच्या 10 जागा निवडून आल्या. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याविषयी राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. शिंदे - फडणवीस अडीच - अडीच वर्षे मुख्यमंत्री सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने यासंबंधी अडीच - अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार पहिले अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस व दुसरे अडीच वर्षे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहतील. अडीच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल. भाजप श्रेष्ठींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांनीही या रणनीतीला हिरवी झेंडी दाखवली आहे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांचीही नावे चर्चेत
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची अडीच वर्षांची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना भाजप अध्यक्ष करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे. मग या स्थितीत त्यांच्या अडीच वर्षांच्या उर्वरित कालावधीत भाजप नेते विनोद तावडे किंवा चंद्रकांत पाटील या दोघांपैकी एकाकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली जातील. त्यानंतर त्यांचा काळ संपल्यानंतर उर्वरित अडीच वर्षे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळतील. भाजपच्या या रणनीतीमुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी अडीच वर्षे ताटकळत बसावे लागेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठीही जोरदार फिल्डींग लावली असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने महायुतीपुढे 1 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरल्याची माहिती आहे. यासाठी त्यांनी 2-2-1 हा फॉर्म्युला सूचवला आहे. भाजपच्या नेतृत्वाने राष्ट्रवादीच्या हा फॉर्म्युला मान्य केला, तर अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. पण सूत्रांनी हा फॉर्म्युला मान्य होण्याची शक्यता नाममात्र असल्याचा दावा केला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)