उ. महाराष्ट्र विभागात काय आहे परिस्थिती:लाडक्या बहिणींच्या रांगा महायुतीला 2019 पेक्षा जास्त आमदार देऊ शकतात
11 hours ago
1
उत्तर महाराष्ट्रात महिला मतदारांनी पुरुष मतदारांवर कडी करीत पहिल्यांदाच भरघोस मतदान केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या लाडक्या बहिणींनी ज्या प्रकारे मतदान केंद्रांवर गर्दी केली होती ती पाहता ४७ पैकी महायुतीच्या विजयी उमेदवारांचा आकडा या वेळी ३० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सहा ते सात जागांवर चुरशीची लढत झाली आहे.
मंत्री छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, रोहिणी खडसे, नगरमध्ये राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात आणि गडाख यांच्या प्रतिष्ठेच्या जागा होत्या. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा खडसेंच्या बाबतीत अनिश्चितता असली तरी इतरांना आपली प्रतिष्ठा राखता येईल, अशीच शक्यता आहे. शिंदेंचे बंडखोर आमदारही अपवादानेच पराभूत होतील.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)