महाविकास आघाडीत पडद्यामागे मोठ्या घडामोडी:निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर अन् अपक्ष उमेदवारांशी संपर्क सुरू

4 hours ago 1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. पण तत्पूर्वी, विरोधकांच्या महाविकास आघाडीने आकड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभरातील निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर उमेदवारांसह अपक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. सत्ता स्थापनेच्या शर्यतीत काही जागा कमी पडल्या तर या उमेदवारांच्या मदतीने महाराष्ट्राचे सत्ताशिखर गाठण्याची महाविकास आघाडीचा मानस आहे. त्यानुसार या नेत्यांशी संपर्क साधला जात आहे, असा दावा केला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली. त्यानंतर आता 23 तारखेला मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार स्थापन होणार? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण महाविकास आघाडीने हे पोल फेटाळून लावत, आपल्या पातळीवर बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी गोळाबेरीज सुरू केली आहे. यासंबंधी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर व अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधत आहेत. शिरसाट यांच्या दाव्यामुळे भाजप सतर्क सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांसोबत जाण्यासंबंधीचे संकेत दिलेत. त्यामुळे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपतचे धाबे दणाणलेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तत्काळ हे वृत्त फेटाळून लावले आहे. पण शिरसाट यांचे संकेत व त्यानंतर दरेकरांनी दिलेले स्पष्टीकरण यावरून महाविकास आघाडीत खूप काही शिजत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर भाजपने सावधपणे पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याचीही माहिती आहे. महायुतीकडूनही अपक्षांशी संपर्क साधणे सुरू दुसरीकडे, महायुतीच्या गोटातही अशीच खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आहे. महायुतीच्या नेत्यांनीही विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बंडखोर व अपक्ष उमेदवारांसी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. यावरून राज्यात महायुती व महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी काही जागांची गरज भासली तर त्यासाठी प्रचंड घोडेबाजार रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा... एकनाथ शिंदे - शरद पवार एकत्र येणार?:संजय शिरसाट म्हणाले - शिंदे नेहमीच योग्य दिशेने जातात, आम्ही त्यांचा शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ मुंबई - विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मतदान यंत्रामध्ये बंद झाल्यानंतर आता राज्यात कुणाची सत्ता येणार? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य युतीचे संकेत दिलेत. यामुळे निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजरकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article