एक हजार विद्यार्थी करणार 11 हजार सूर्यनमस्कार:श्रीसमर्थ विद्या प्रसारक मंडळाचा उपक्रम, मुकुंदकाका जाटदेवळेकर यांना समर्थ पुरस्कार जाहीर‎

2 hours ago 1
श्रीसमर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दासनवमी, रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त मंगळवारी, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सहकारनगर येथील नवीन प्रशालेच्या प्रांगणावर मंडळाच्या शाळांचे १ हजार विद्यार्थी योग विद्याधामच्या माध्यमातून प्रत्येकी ११ असे सुमारे ११ हजार सूर्यनमस्कार करणार आहेत. श्रीसमर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावेडीच्या नवीन समर्थ प्रशालेच्या प्रांगणावर १ हजार विद्यार्थी श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत ११ मनाचे श्लोक म्हणत प्रत्येकी अकरा सूर्यनमस्कार करणार आहेत. मंडळाचे आधारस्तंभ स्वर्गीय दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ समर्थ विचारांचा प्रचार व प्रसारासाठी देण्यात येणारा मानाचा समर्थ पुरस्कार महंत मुकुंदकाका जाटदेवळेकर यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती दासनवमी उत्सव समितीचे प्रमुख व मंडळाचे व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली. या कार्यक्रमासाठी आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. ५६ वर्षांपासून मंडळाच्या वतीने दासनवमीनिमित्त रामदास स्वामी यांच्या विचाराचे प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे. यानिमित्त शालेय स्तरावर विविध गटांत पाठांतर, हस्ताक्षर, वक्तृत्व, निबंध, चित्रकला आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच खुल्या गटात वक्तृत्व, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. समर्थांच्या साहित्यावर आधारित समर्थ विचार अभ्यासकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. २२ फेब्रुवारी दासनवमी उत्सवात जाटदेवळेकर महाराजांचे प्रवचन आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांना समर्थ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष भा. ल. जोशी, उपाध्यक्ष दीपक ओहोळ, सचिव सुरेश क्षीरसागर, सचिव प्रभाकर ओहोळ, खजिनदार संजय कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य ॲड. किशोर देशपांडे, विकास सोनटक्के, ॲड. वेद देशपांडे, सचिन क्षीरसागर, संध्या कुलकर्णी, निमंत्रित सदस्य स्वप्नील सोनटक्के आदींचे मार्गदर्शन लाभत आहे. मुख्याध्यापिका वसुधा जोशी, प्राचार्य संगीता जोशी, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापक अजय महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत. विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सर्वाधिक बक्षीस जिंकणाऱ्या शाळेला समर्थ करंडक देण्यात येणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article