मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभेतील भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. File Photo
Published on
:
08 Feb 2025, 8:57 am
Updated on
:
08 Feb 2025, 8:57 am
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र पाठोपाठ एक है तो सेफ है...! मुळेच दिल्ली विधानसभेतही मोठा विजय भाजपला मिळाला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा विकास आणि सुशासनाच्या दिशेने भाजपला मिळालेला कौल असल्याचे म्हटले आहे. (Delhi Assembly Results)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमुखी विकासावर जनतेने शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. 27 वर्षानंतर दिल्लीत सत्तेची संधी भाजपला मिळाली. दारुण पराभवाला आप सामोरे जाताना एकीकडे मुख्यमंत्री आतिशी विजयी झाल्या. तर दुसरीकडे आपचे नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक दिग्गज पराभूत झाले. भाजपच्या या अभूतपूर्व, बहुप्रतिक्षित विजयानंतर उपराजधानी नागपुरात शहर भाजप कार्यालय, विभागीय कार्यालय येथे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. ढोलताशांच्या गजरात महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत, पेढे, लाडू भरवित आनंदोत्सव साजरा केला.