Eknath Shinde whitethorn resign arsenic Chief Minister : एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच मुख्यटमंत्रिपद मिळावं यासाठी देखील एकनाथ शिंदे आग्रही आहेत. वाचा सविस्तर...
एकनाथ शिंदे, नेते, शिवसेनाImage Credit source: Facebook
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचा आज कार्यकाळ संपतो आहे. अशात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तसंच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.