एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत भारतीय छात्र संसदेचे आयोजन:केंद्रीय क्रीडामंत्री मांडवीय यांच्या उपस्थितीत 8 फेब्रुवारीला उद्घाटन; 250 आमदार होणार सहभागी
7 hours ago
1
पुणे - एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. छात्र संसदेचे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात सीएमओ बीओएटीचे सह संस्थापक अमन गुप्ता विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना 'आदर्श विधानसभा सभापती पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. छात्र संसदेत भारतीय राजकारणाची विचारधारा, रेवडी संस्कृती, भारतीय संस्कृती विरुद्ध पाश्चात्य प्रभाव आणि एआय व सोशल मीडियाचे प्रभाव यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सत्रे होणार आहेत. समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे आणि मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे ८ आणि ९ फेब्रुवारीला आमदारांसाठी 'नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम' आयोजित करण्यात आला असून, यामध्ये देशभरातील २५० आमदार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आमदार विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड हे छात्र संसदेचे संस्थापक आहेत. या प्रसंगी उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येईल. सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी ११.४५ वाजता होणार्या समारोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे, मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत, असे डॉ. पांडे यांनी सांगितले. छात्र संसदेत भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर, रेवडी संस्कृती- एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार, भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर : भारतीय युवकांची कोंडी, एआय आणि सोशल मिडिया : सामर्थ्य की अनपेक्षित संकट अशी सत्रे होणार आहे. याशिवाय लोकशाहीचा रंगमंच व विशेष ‘युथ टू युथ कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले गेले आहे. आमदारांसाठी ‘नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम’ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने आमदारांसाठी ‘नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम’ ८ आणि ९ फेब्रुवारीला कोथरूड येथील डब्ल्युपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. या परिषदेत देशातील जवळपास २५० आमदारांनी उपस्थित राहण्याची संमती दर्शविली आहे. या नेतृत्व क्षमता संर्वधन कार्यक्रमात’ सहभागी सर्व आमदार हे भारतीय छात्र संसदच सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत भारतीय छात्र संसदेचे आयोजन:केंद्रीय क्रीडामंत्री मांडवीय यांच्या उपस्थितीत 8 फेब्रुवारीला उद्घाटन; 250 आमदार होणार सहभागी