एसटी बस थांबत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार:करमाळ्याच्या ग्रामीण‎भागातील समस्या‎

2 hours ago 1
तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी करमाळा एसटी डेपोच्या काही बसेस थांबत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी गणेश चिवटे यांच्याकडे केली. याची दखल घेत चिवटे यांनी डेपो व्यवस्थापक होनराव यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या सह्यांसह निवेदन दिले व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका, अन्यथा होणाऱ्या नुकसानास आपण जबाबदार राहणार का? असा सवाल उपस्थित केला. करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रवासाच्या व इतर कोणत्याही अडचणी आल्यास भाजप संपर्क कार्यालयात संपर्क साधवा, असे गणेश चिवटे यांनी सांगितले. आपण कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, अशी ही त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिली. या वेळी वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, मांगीचे युवा नेते किरण बागल, नानासाहेब अनारसे, हर्षद गाडे व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी रीतसर आमच्याकडे तक्रार द्यावी प्रत्येक गावातील प्रवासी यांना आम्ही बसमध्ये घेणे बंधनकारक आहे. परंतु काही कारणाने जर एसटी थांबत नसेल तर तशी विद्यार्थ्यांनी रीतसर तक्रार आमच्याकडे करावी. आम्ही याच्यावर उपाययोजना करू. वीरेंद्र होनराव, व्यवस्थापक, करमाळा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article