ऑरिकचा बनावट शिक्का बनवून शेतकऱ्यांना विकले बनावट प्लाॅट:करमाडच्या शेतकऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक, प्रकरण ऑरिककडे गेल्यावर परत केले पैसे

2 hours ago 2
डीएमआयसीली जमीनी देणाऱ्या शेतकऱ्यांना १५ टक्के भुखंड परत मिळते. याच अनुषंगाने ऑरिक सिटीकडे १५ टक्के भुखंड मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सहा शेतकऱ्यांची एका भामट्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा फसवणूक केली होती. करमाड येथील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. यात फसवणूक करणाऱ्यांने ऑरिक सिटीचे बनावट शिक्के व बनवाट रजिस्ट्री करुन देत शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. शेतकऱ्यांनी मिळणारे १५ टक्क्याच्या भुखंड बदलून मोक्याच्या जागेत रोडटच देतो असे सांगत ही फसवणूक केली होती. डीएमआयसीचे जालन्यात बनावट अकाऊंट खोलत त्यात शेतकऱ्यांकडून आलेले डीडी टाकले. यातील काही शेतकरी ऑरिक सिटीच्या कार्यालयात आल्यानंतर ही बाब उघड झाली. हे प्रकरण अंगउलट येईल हे ओळखून फसवणूक करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांनी दिलेल्या पैसे परत केले. व शेतकऱ्यांनी तक्रार करून नये, यासाठी राजकीय ताकतीचा वापर करून त्यांच्याकडे दिलेले बोगस रजिस्ट्री परत घेतल्याने हे प्रकरणाची कुठेच वाच्यता झाली नाही. ऑरिकने हा विषय गांभीर्याने घेत, बनावट शिक्का तयार करणाऱ्या विरोधात करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेत फसवले ऑरिक सिटीला करमाड,लाडगाव व परिसरातील ५५७ शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या आहे. त्यापैकी ३८० शेतकऱ्यांनी १५ टक्केचा भुखंडासाठी अर्ज केला आहे. आतापर्यंत १८० शेतकऱ्यांना भुखंड वाटप झाले आहे. ऑरिक सिटी परिसरात शेतकऱ्यांचे भुखंड सोडता इतर प्लाॅटच उपलब्ध नाही. असे असतानाही काही भामट्याचे शेतकऱ्यांच्या १५ टक्के असलेल्या भुखंड आणि त्यातून मिळणाऱ्या पैसावर डोळा ठेवत ही फसवणूक केली. ऑरिक मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांची त्यांने ओळखी वाढवल्या. त्यांना विश्वासत घेत त्यांना मिळणारे भुखंड हा आतील बाजूस आहे. त्यामुळे तुम्हाला रोडटच भुखंड मिळवून देतो. डिडी आणा. हा फसवणूक करणारे ऑरीक सिटीत अनेक वेळा येऊन गेला. शेंद्रा व ऑरिक मध्ये त्या फसवणूक करणारे काही कंपन्यात जेवण पुरविण्याचे ठेकेही असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सदरील फसवणूक करणारा लाडगाव परिसरातील असल्याची चर्चा सध्या होत आहे. हाॅटेलमध्ये केली रजिस्ट्री भुंखडासाठी त्या भामट्याने ऑरिकीच्या माध्यमातून झालेल्या रजिस्ट्रीप्रमाणे बनवाट(झेराॅक्स) आणत या सहा जणांना रजिस्ट्री करून दिली. ही रजिस्ट्री संभाजीनगरातील एका हाॅटेलात बसून केली आहे. असल्याची माहिती एका अधिकऱ्यांने दिली. हे प्रकरण दाबवण्यासाठी करमाड येथील सत्ताधारी पक्षातील लोकांनी पुढाकार घेतल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले नाही. यात लाखो रुपयांची हेराफेरी झाली आहे. भूखंडाविषयी बाहेर व्यवहार करू नका - महेश पाटील, समन्यवयक ऑरिक ​​​​​​​एका भामट्याने १५ टक्के भुखंडासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना फसवल्याची माहिती आमच्याकडे आली होती. त्याने आॅरिकचे बनावट शिक्के रजिस्ट्रीची झेराॅक्स काढून तेच त्या शेतकऱ्यांना दिली. त्यावेळी आम्ही खबरदारी म्हणून करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासह फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनाही तक्रार देण्याचे सांगितले. मात्र त्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली नाही. त्यांचे पैसे परत मिळल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले. भुखंडाविषयी बाहेर कोणाशी व्यवहार करू नका. थेट आमच्याकडे या. पोलिस तपास करताहेत- शैलेश धाबेकर, वरिष्ठा समन्वय ऑरिक फसवणूक झालेल्या विषयी आम्ही तक्रार देण्याचे सांगितले.पण कोणीच पुढे आले नाही. या विषयी आम्ही आॅरीकचा शिक्का बनविल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस तापास करीत आहे. तपास सुरू आहे- प्रताप नवघरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक, करमाड ऑरिकतर्फे बनावट शिक्क्याबाबत आमच्याकडे तक्रार आलेली आहे. या विषयी आमचे अधिकारी तपास करीत आहे. यात काहीजणांचा जबाब नोंदविण्यात आला आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article