Youth suicide Case: ढालेगाव उच्चपातळी बंधाऱ्यांमध्ये उडी घेत युवकाची आत्महत्या

2 hours ago 1

रविवार रात्रीची घटना, मृतदेह चा शोध सुरू

परभणी/पाथरी (Youth termination Case) : माजलगाव सीमेवर असणाऱ्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या बॅक वॉटर मध्ये उडी घेत पाथरी तालुक्यातील एका युवकाने आत्महत्या (Youth suicide) केल्याची घटना रविवार २३ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर सोमवारी दिवसभर गोदावरी नदी पात्रातील पाण्यात मृतदेहाचा शोध प्रशासनाकडून सुरू होता .

प्रशांत माणिकराव गित्ते (वय २९ ) रा . ज्ञानेश्वरनगर पाथरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे (Youth suicide) नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत व त्याचे चुलते रविवार २२ सप्टेंबर रोजी रात्री माजलगाव हून चारचाकी गाडीने पाथरीकडे येत होते. राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील ढालेगाव पुलावर गाडी आल्यानंतर गाडीत बसलेल्या प्रशांत गित्ते याने गाडीच्या चाकाचा आवाज येत असल्याचे म्हणत गाडी पुलावर थांबवली. यावेळी त्याने पुलाच्या कड्यावरून गोदावरी नदीपात्रामध्ये उडी घेतली.

ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यामुळे गोदावरी नदी पात्रात पाणी असल्याने सदरील युवक (Youth suicide) पाण्यामध्ये बुडाला. दरम्यान रात्री उशिरा माजलगाव पोलीस ठाण्यात व पाथरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली होती. सोमवारी सकाळी घटनास्थळी माजलगाव व पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. सोबतच पाथरी व मानवत अग्निशामक दलाचे कर्मचारी ही मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते .सोमवारी दिवसभर मृतदेहाचा शोध घेण्यात आला. दुपारी पाऊस आल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. ढालेगाव बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढल्याने बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडे असल्याने (Youth suicide) मृतदेह वाहून गोदावरी नदीत पात्रात गेला असल्याची शक्यता असल्याने गोदावरी किनारी भागातील पोलीस पाटील यांना घटने संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article