Chikhali Terrible accident: एसटी बस व मोटार सायकलचा भीषण अपघात, 2 जागीच ठार 

2 hours ago 1

दोन जागीच ठार तर एक गंभीर जखमी

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Terrible accident) : भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसने समोरच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. त्यांमध्ये झालेल्या (Chikhali Terrible accident) अपघातात मोटार सायकल वरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी मेरा खुर्द फाटया लगत शिंगणे यांच्या घासलेट डेपो जवळ घडली.

अंढेरा पोलीस स्टेशन (Andhera Police) अंतर्गत येणाऱ्या चिखली ते जालना नॅशनल हायवे रोडचे चौपदरी सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच पाच वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे त्यामुळे या हायवे रोडवरून लहान मोठी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने रोडवरील ठिकठिकाणी अपघाताची (Chikhali Terrible accident) मालिका सुरूच आहे . त्यामध्ये २३ सप्टेंबर रोजी दुपारी संभाजी नगर ते नागपूर जाणारी एसटी बस क्र एम एच १४ के क्यू ४९६७ ही भरधाव वेगात धावत होती. त्याच एसटी बस समोर रोडवर समोर धावत असलेली मोटार सायकल क्र एम एच २८ ए ए ४१६२ वर केळवद येथील तीन गावाकडे जात होते.

मात्र अचानक पाठीमागून भरधाव वेगात धावणाऱ्या एसटी बस चालकाने मोटार सायकलला (Chikhali Terrible accident) जोरदार धडक दिली. बसलेल्या धडकेत मोटार सायकल वरील तीन जण शेतात जावून आदळले आणि दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला ही घटना मेरा खुर्द फाट्यालगत दिपक शिंगणे यांच्या घासलेट डेपो जवळ घडली या घटनेची माहिती रोडच्या आजु बाजूला शेतकऱ्यांनी तात्काळ (Andhera Police) अंढेरा पोलीसांना दिली असता लगेच ठाणेदार विकास पाटील यांच्या सह बिट जमादार कैलास पर्वत व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हाजर झाले. पंचासमक्ष पंचनामा केला असता मृतक राजु भीमराव खोलगडे वय ३५ वर्ष, नंदू भगवान सगट वय ३० वर्ष, आणि जखमी ज्ञानेश्र्वर मदन जामोळकर वय ३४ वर्ष सर्व राहणार केळवद ता चिखली या तीन जंनाना तात्काळ चिखली येथील रुग्णालयात हलविले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article