ओरिसा येथे 24 ते 28 डिसेंबरदरम्यान होणार स्पर्धा:पुरुष व महिला गटाचा समावेश, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगासन स्पर्धेत अमरावती विद्यापीठाची चमू घोषित
2 hours ago
2
‘कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इन्डस्ट्रियल टेक्नॉलॉजी’, भुवनेश्वर (ओरिसा) येथे २४ ते २८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगासन (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची चमू घोषित करण्यात आली आहे. पुरुष संघात श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा यश राठी, नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतचा नितीन राठोड व विश्वजीत इंगोले, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा सुरज वैद्य व बिट्टू कुमार साव, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा करण भालेराव, दर्शन जाधव, सर्वेश डांगे आणि राज काकडे यांचा समावेश आहे. महिला संघात नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतची प्रतीक्षा तुपट, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची आस्था जोंधळेकर, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची समीक्षा कडू, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची चेतना देशमुख व आयुषी पांडे, श्रीमती आर.डी.जी. महिला महाविद्यालय, अकोलाची अनिता चव्हाण व प्रेरणा डोंगरे, जे.डी. पाटील महाविद्यालय, दर्यापूरची श्रावणी चव्हाण आणि प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंटची कोमल सुलताने यांचा समावेश आहे. निवड झालेल्या खेळाडूंचे कुलगुरू डॉ. बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. ढोरे व कुलसचिव डॉ. असनारे यांनी अभिनंदन केले आहे. १२ डिसेंबरपासून प्रशिक्षण पुरुष व महिला संघाचा प्रशिक्षण वर्ग हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (डीसीपीई) येथे आगामी १२ डिसेंबरपासून सुरु होईल. हे प्रशिक्षण २१ डिसेंबरपर्यंत चालणार असून त्यानंतर संघ रवाना होईल. दरम्यान प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)