कंत्राटी शिक्षक भरतीविरोधात शिक्षकांची शाळाबंदची हाक:जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार

2 hours ago 2
जिल्ह्यातील २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होणार असून, या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. २५ सप्टेंबर रोजी सर्व शाळा बंदची हाक देण्यात आली असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे या शाळा बंद करण्याची चर्चाही शिक्षण वर्तुळात रंगली होती. मात्र आता २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. महामोर्चाच्या नियोजनाबाबत रविवारी जि. प. कर्मचारी भवन येथे विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. १५ मार्च व ५ सप्टेंबर २०२४ चे दोन्हीही शासन निर्णय सरकारने पूर्णपणे मागे घेतल्याशिवाय आता माघार नाही, यासह अन्य बाबींवर बैठकीत एकमत झाले. मोर्चा भरकटवायचा आणि राजकीय हेतूने प्रेरित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण आपण मोर्चा योग्य व सनदशीर मार्गाने काढावयाचा आहे. एकमेकांना सहकार्य करून कुठल्याही प्रकारचे मतभेद न ठेवता हे आंदोलन शिक्षकांनी शिक्षकांसाठी केलेले आंदोलन असून, मोर्चा शिस्तीतच निघणार. मोर्चामध्ये शाळा समन्वय समितीचे सदस्य त्याचप्रमाणे पालकांना सामावून घ्या. घोषणा देताना कोणाच्या वैयक्तिक भावना दुखावतील, अशा घोषणा देऊ नका. मोर्चासाठी फिरती पथके तयार करा. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा, असा सूचना यावेळी देण्यात आल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article