सिद्धू मूसेवाला आणि जग्गू भगवनपुरिया यांच्यानंतर आणखी एका पंजाबी गायकाला टार्गेट करण्यात आलं आहे. कॅनडात पंजाबी गायक प्रेम ढिल्लोच्या बंगल्यावर गोळीबार करण्यास आला. जेंटा खरारने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
गोळीबारानंतर आरोपींनी एक पोस्ट शेअर करत हल्ल्याची जबाबदारी घेतली. या व्हायरल पोस्टमध्ये संगीत उद्योगातील वर्चस्वाबाबत उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या पोस्टमध्ये सिद्धू मूसेवाला आणि जग्गू भगवानपुरिया यांची नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. जयपाल भुल्लर टोळीशी संबंधित असलेल्या आणि सध्या ऑस्ट्रेलियात असलेल्या जेंटा खरार याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जेंटा हा खलिस्तानी दहशतवादी अर्श दलचा निकटवर्तीय मानला जातो.