Banana sold for 6 million: सर्वसामान्यांसाठी पोष्टीक फळ म्हणून केळी ओळखली जाते. महाराष्ट्रात केळीचे पीक जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु केळीला कधी चांगला दर मिळतो कधी दर घसरलेले असतो. परंतु केळ्याच्या आर्टवर्कने चित्रकारास मालामाल करुन दिले आहे. त्याचे हे आर्ट वर्क 5.2 मिलियन डॉलर म्हणजेच 52 कोटी रुपयांत विकले गेले आहे. काय आहे त्या केळ्याच्या आर्टवर्कमध्ये ज्यामुळे खरेदीदारांनीची खरेदीसाठी झुंबळ उडली होती.
ती प्रसिद्ध कलाकृती
न्यूयॉर्कमध्ये सध्या एका केळ्याची चर्चा होत आहे. हा केळा म्हणजे एक आर्टवर्क आहे. केळीचे चित्र असणारे हे आर्टवर्क आहे. भिंतीवर टेपने चिपकवलेला एक केळा आहे. हा डक्ट-टेप असणारा केळा मौरिजियो कॅटेलनचे आर्टवर्क ‘कॉमेडियन’ आहे. ही प्रसिद्ध कलाकृती आहे. न्यूयॉर्कमधील लिलावात या केळ्याची किंमत 5.2 मिलियन अमेरिकी डॉलर होती. शेवटी 6.2 मिलियन डॉलर म्हणजे 52 कोटींत या केळ्याची विक्री झाली.
क्रिप्टो उद्यमी जस्टिन सन यांनी 2019 मध्ये व्हायरल कलाकृती तीन भागात घेतली. मौरिजियो कॅटेलन यांची भिंतीवर डक्ट-टेप असणारी कलाकृती याचा लिलाव झाला. या केळीचा लिलावाची सुरुवात 1 ते 1.5 मिलियन अमेरिकी डॉलरपासून झाली. त्यानंतर अनेक विक्रम या लिलावात मोडले गेले.
हे सुद्धा वाचा
कोणी घेतला तो केळा
कॉमेडियन नावाच्या 2019 मधील कलाकृतीचे तीन संस्करण आहे. त्यातील एकाचा लिलाव झाला. 5.2 मिलियन यूएस डॉलरमध्ये हा लिलाव झाला. त्यानंतर लिलाव करणारा ओलिवर बार्कर म्हणाला, मी कधी विचार केला नव्हता एका केळ्यासाठी 5 मिलियन डॉलर देणार आहे. केळीसाठी क्रिप्टो उद्योजक जस्टिन सन यांनी शेवटची बोली लावली. ती 6.2 मिलियन अमेरिकी डॉलर होती. आता सन यांना केळा आणि डक्ट टेपचा एक रोल मिळणार आहे.
2019 मध्ये आर्ट बासेल मियामी फेअरमध्ये कॉमेडियन्सने तीन भाग काढले. त्याची US$120,000 किंमत होती. त्यामुळे त्याच्या बातम्या जगभरात झाल्या. न्यूयॉर्कमधील एका प्रदर्शनादरम्यान कलाकार डेव्हिड डटुनाने या कलाकृतीतून केळी काढली आणि ती खाल्ली तेव्हा ते व्हायरल झाले.