कैलासने खात्यावर आलेले 1 लाख 16 हजार केले परत:नाचनवेलच्या युवकाचा असाही प्रामाणिकपणा

1 day ago 1
नाचनवेल आमदाबादच्या शेतकऱ्याचे पैसे नाचनवेलच्या शेतकऱ्याच्या खात्यावर चूकून जमा झाल्यावर कैलास येडूबा थोरात यांनी प्रमाणिकपणे परत केल्याने कैलास थोरतचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदाबाद येथील संतोष भिकन म्हस्के यांना रोहयोअंतर्गत गायगोठ्याचे एक लाख सोळा हजारांचे अनुदान मंजूर झाले होते . त्यांच्या खात्यावर अनूदानाची रक्कम मात्र जमाच झाली नाही. त्यामुळे ते सतत बँक व कन्नड पंचायत समितीत येरझरा घालीत होते. पंचायत समितीतील मग्रारोहचे ऑपरेटर संतोष मुरमुडे यांच्याकडे चौकशी केली असता तुमचे नाचनवेल येथील सहकार बँकेत सांगितलेल्या खाते क्रमांकावर चौकशी केली असता १,१६,००० रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले. या वेळी खातेदार म्हणून कैलास थोरात यांचे नाव समोर आले. त्यांच्या खात्यावर १८ सप्टें २०२४ एक लाख १६००९ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचा संदेश यापूर्वी प्राप्त झाला होता . त्यानुसार त्यांनीही संबंधी चौकशी केली. पण त्याचा उलगडा झालाच नाही . ग्रामसेवक अशोक काळे व रोजगार सेवक बाळू बनकर याकामी पुढाकार घेत म्हस्के यांच्या अनुदान रकमेचा चौकशीअंती निपटारा करण्यासाठी कैलास थोरात यांनी क्षणाचाही विलंब न लावता आलेली रक्कम १४ ऑक्टोबरला प्रामाणिकपणे म्हस्के यांच्या खात्यावर वळवली. त्यामुळे त्यांचा जिवात जीव आला अन् सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांच्या या प्रमाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे सहकारी बँक कर्मचारी व गावपदाधिकाऱ्यांनी थोरात यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश शिंदे, कैलास शेळके, शाखा व्यवस्थापक सुरे, रोखपाल जाधव यांची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article