कोजागरीला जिल्ह्यात चार लाख लिटर दुधाची मागणी:दुधात पडणारी औषधीयुक्त किरणे आरोग्यदायक

2 hours ago 1
शरद पौर्णिमा, अर्थात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बुधवारी १६ ऑक्टोबरला रोजी शहरात रोजच्या तुलनेत तीन पटीने जास्त अर्थात ४ लाख लिटर दुधाची मागणी नोंदवण्यात आली. दररोज जिल्ह्यात १ लाख लिटर दुधाची आवश्यकता असते. परंतु, कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी दुधाची मागणी वाढते, ही बाब लक्षात ठेऊन डेअरी व्यावसायिकांनी आधीच वाढीव दुधाची सोय करून ठेवली होती. दर्जानुसार म्हशीचे दूध ६५ रु. लिटरपासून ते १०० रु. लिटरपर्यंत तर गायीचे दूध हे ५५ रु. लिटर दराने विकले गेले. १ ऑक्टोबरपासून म्हैस व गायीच्या दुधाचे दर ५ रुपयाने वाढले तरी त्याचा नागरिकांच्या मागणीवर कोणताही परिणाम झाला नाही. कोजागिरीसाठी एक आठवडा आधीपासून मागणी नोंदवण्यात आली होती. तसेच आज सकाळपासून शहर व जिल्ह्यातील बहुतेक मोठ्या डेअरींवर दूध खरेदी करण्यासाठी उर्वरित. पान ४ ^शहरात कोजागिरीचा उत्साह असून दुधापासून रात्री बासुंदी घोटली जाते. त्यामुळे डेअरी असोसिएशनने दुधाची तपासणी करून त्यांची गुणवत्ता तपासली. तो योग्य असल्याचे कळाल्यानंतरच दूध विक्रीस परवानगी देण्यात आली. रोजच्यापेक्षा तीन पटीने जास्त दुधाला मागणी आहे. - गिरीष कराड, अध्यक्ष, अमरावती जिल्हा डेअरी असोसिएशन.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article