कोण आहे दीपिका देशवाल; उद्या ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित file photo
Published on
:
19 Jan 2025, 7:06 am
Updated on
:
19 Jan 2025, 7:06 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी २० जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील सर्व प्रमुख व्यक्तींना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये भारताची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक दीपिका देशवाल हीचेही नाव समाविष्ट आहे. तिला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खास निमंत्रण मिळाले आहे.
दीपिका देशवालने कोरोना काळात निस्वार्थ समाजसेवा आणि महिलांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काम केले. यासाठी तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले. २०२३ मध्ये तिने तिसऱ्यांदा संयुक्त राष्ट्राला संबोधित केले. असे करणारी ती सर्वात तरूण भारतीय आहे. दीपिका देशवाल दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची माजी सचिव आहे. तसेच त्यांनी २०२२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती.
शपथ ग्रहण सोहळ्याचे ठिकाण बदलले
अमेरिकेत आर्कटिक वादळ आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी वॉशिंग्टन डीसीमधील तापमान उणे ११ अंश सेल्सियसपर्यंत घसरू शकते. खराब वातावरणामुळे ट्रम्प यांचा शपथ सोहळा कॅपिटल रोटुंडामध्ये होणार आहे. टॅम्प यांनी सांगितले की, वॉशिंग्टनमधील तापमान नीचांकी पातळीवर पोहोचू शकते. मला लोकांना आजारी पडताना पहायचे नाही. समारंभाच्या दिवशी तासनतास बाहेर राहणाऱ्या हजारो कायदा अंमलबजावणी आणि समारंभ कर्मचाऱ्यांसाठी हे धोकादायक ठरेल. जर तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार असाल तर कृपया उबदार कपडे घाला.