कोपरी-पाचपाखाडी विधानसभा रवींद्र मतदारसंघात मिंधेंनी पाच शिवसैनिकांवर प्रचंड दडपशाही केल्याचे समोर आले आहे. वागळे इस्टेट, शांतीनगर येथील उपविभागप्रमुख रवींद्र वाघमारे यांना कोणतेही कारण नसताना व कोणाचीही तक्रार नसताना मतदानाच्या दिवशी पाच तास श्रीनगर येथील पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. माझा गुन्हा काय असे वाघमारे विचारत असताना त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. सकाळी 10 वाजता ताब्यात घेतलेल्या वाघमारे यांची दुपारी 3 वाजता सुटका करण्यात आली.
साध्या गणवेशातील दोन पोलीस आले. त्यांनी वाघमारे यांना ‘तुम्हाला आमच्या सोबत यावे लागेल’ असे सांगितले. मी पोलीस ठाण्यात का यायचे? माझ्याबद्दल काही तक्रार आहे का असे वाघमारे यांनी विचारले. तुमच्या विरोधात ६०-७० तक्रारी आहेत, तुम्ही पोलीस ठाण्यात चला. तुम्हाला तिथे सगळे सांगतो असे पोलिसांनी सांगितले
रवींद्र वाघमारे हे निष्ठावंत शिवसैनिक असून एकनाथ शिंदे निवडणूक लढवत असलेल्या कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख आहेत. मतदानाच्या दिवशी वाघमारे हे शांतीनगर येथे एका दुकानाच्या बाहेर उभे असताना
आणि वाघमारे यांना मोटारसायकलवर बसवून श्रीनगर पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार शिवसेनेचे कार्यालयप्रमुख पांडुरंग आयरे आणि मनसेच्या स्मिता साळवी यांच्यासमोर घडला.
श्रीनगर पोलीस ठाण्यात सकाळी 10 वाजता आणलेल्या रवींद्र वाघमारे यांना दुपारी 3 वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले. मला इथे का आणले, माझ्याविरोधात कोणाची तक्रार आहे अशी ते सारखी विचारणा करत होते, परंतु पोलिसांनी त्यांना तुम्ही इथे बसून रहा या पलीकडे कोणतेही उत्तर दिले नाही. अखेर दुपारी तीननंतर वाघमारे यांची सुटका करण्यात आली.
थेट घरी जा, रस्त्यावर इथे-तिथे दिसू नका
आम्ही तुम्हाला सोडतो, पण इथून थेट घरी जा, पुन्हा रस्त्यावर इथे- तिथे कुठे दिसू नका असा दम पोलिसांनी वाघमारे यांना भरला.
जरा समजून घ्या, आमच्यावर दबाव आहे
वाघमारे यांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला, तेव्हा जरा आम्हाला समजून घ्या, आमच्यावरही दबाव आहे असे एका पोलिसाने वाघमारे यांना खासगीत सांगितले.
कल्याण-डोंबिवलीत मतदानाचा टक्का वाढला
डोंबिवली – कल्याण-डोंबिवलीमधील सर्वच मतदारसंघात गेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का घसरला होता. हा मतदानाचा टक्का सरासरी ४० ते ४५ टक्क्यांवर स्थिरावला होता. राज्यातील सर्वाधिक कमी मतदान कल्याण मतदारसंघात होत असल्याने निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी खंत व्यक्त केली होती. हा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने महापालिका, शाळा, कॉलेज आणि विविध पथकांच्या मदतीने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून कल्याण-डोंबिवलीतील मतदानाचा टक्का तब्बल 15 टक्क्यांनी वाढला आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांच्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीतील मतदानाचा टक्का कमी होता. कल्याण-डोंबिवली हा सुशिक्षित मतदारसंघ असून मतदान कमी प्रमाणात होत असल्याने आयोगाने चिंता व्यक्त केली होती. यंदाच्या निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे शिक्षण विभाग, दहा प्रभागातील सहाय्यक आयुक्त, स्थानिक शासकीय यंत्रणा यांनी विद्यार्थी, कर्मचारी व सामाजिक संस्थांच्या मदतीने विविध उपक्रम हाती घेतले. या मतदान जनजागृती मोहिमेत यादीतील नाव, केंद्र, केंद्राविषयी साधेसोपे मार्ग, संकेतस्थळ हे सर्व क्यूआर कोडच्या माध्यमातून समाज माध्यमातून उपलब्ध करून दिल्याची माहिती स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव यांनी दिली.