शिरोली एमआयडीसी पुढारी वृत्तसेवाः ऊस तोडणीसाठी उभा फड पेटवल्याने त्यामध्ये एका नवजात बिबट्याच्याच बछड्याचा होरपळून मृत्यू झाला होता तर एका घोणस जातीच्या सापाचेही डोळे आगीत गेले आहेत. ही घटना नागाव ता. हातकणंगले येथील हिंगणे मळ्यात घडली होती. त्यामुळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य वन विभागाने मान्य केले आहे. तर या बिबट्या मादी सोबत आणखी बछडे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे बिबट्याचे या परिसरातील अस्तित्व खरे झाले आहे. परिसरात बिबट्या असल्याने जनतेत खळबळ माजली आहे.
गुरूवारी घटनास्थळी वनविभागाचे अधिकार्यानी भेट देवून घटनेची पाहणी करत ड्रोनच्या साहाय्याने मादीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कसलाही सुगावा मिळाला नाही. हिंगणे मळयातील चिंतामणी सोळांकुरे यांच्या ऊसाच्या फडाला मंगळवारी ऊस तोड आल्याने फडकऱ्यांनी उभा ऊस चारी बाजूनी पेटवून दिल्याने यात पिलासह लपलेले बिबट्या मादीने जाळाची धग लागताच पलायन केले असावे. तर एका बछड्यांला आगीने रौद्ररूप धारण केल्याने मादीला सुरक्षित ठिकाणी नेण्यास उशीर झाला त्या एका बछड्यांला वाचविता आले नाही त्यामुळे ऊसाच्या फडात होरपळून मृत्यू झाला. बछड्याचा जन्म ७ ते ८ दिवसांपूर्वी झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे या परिसरात अन्य बछडे व त्यांची आई सुरक्षित असावेत किंवा याच फडात त्यांचाही होरपळून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतातील ऊस अजून तोडून पूर्ण झालेल्या नसल्याने हा अंदाज लावण्यात येत आहे.
यावेळी करवीरचे वन अधिकारी रमेश कांबळे, नरंदे वनपाल एम. एस. पोवार , वनरक्षक विकास घोलप, अमोल चव्हाण यानी घटनास्थळावर येवून घटनेची पाहणी व तपास करीत आहेत.