Published on
:
08 Feb 2025, 9:10 am
Updated on
:
08 Feb 2025, 9:10 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परिक्षा दोन दिवसांवर आली असताना कोल्हापुरात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकीटवर वेगळेच विषय आले आहेत. परिक्षेच्या तोंडावर झालेल्या गोंधळाने विद्यार्थ्यी संभ्रमात आहेत.
११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने शनिवारी कोल्हापुरातील एका शाळेत पीरक्षेचे हॉल तिकीट वाटप करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांचे विषय बदलून आल्याचे विद्यार्थ्यांच्या निर्दशनास आले. तर काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेले नाही. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले आहे त्यावर कॉम्युटर सायन्सच्या ठिकाणी मराठी भुगोल, जीवशास्त्रा विषयाच्याऐवजी गणित आणि मराठी असे विषय आले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पालक, विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी केली. काही विद्यार्थ्यांना आपले नुकसान होणार म्हणून रडू कोसळले. याबाबत पालकांनी संबंधित शाळा प्रशासनाला जाब विचारला. या ठिकाणी गोंधळ उडाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
14 लाख 94 हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या परीक्षेत यंदा 14 लाख 94 हजार बारावीचे विद्यार्थी, तर 16 लाख 7 हजार दहावीचे, असे एकूण 31 लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 80 हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान घेण्यात येणार आहेत.