कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा दिमाखात संपन्न

2 hours ago 2

Published on

12 Oct 2024, 12:58 pm

Updated on

12 Oct 2024, 12:58 pm

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याला अनेक वर्षांची प्रसिद्ध परंपरा आहे. प्रतिवर्षीप्रमाणे शनिवारी (दि.१२) सूर्यास्तावेळी म्हणजेच सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी शमीपूजनाचा सोहळा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते व संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे यशराजराजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याची जय्यत तयारी कोल्हापूर दसरा महोत्सव समिती, छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासह महापालिका व प्रशासनाच्या विविध विभागांच्या वतीने करण्यात व कोल्हापूर: विजयादशमीच्या सीमोल्लंघन सोहळ्यासाठी दसरा चौक येथे करण्यात आली होती.

दरम्यान, दसरा मैदानात लकडकोट उभारून त्यावर शमीपूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मैदानाच्या पूर्वेकडे स्वराज्याचा भगवा ध्वज व जरीपटका उभारण्यात आला होता. हुजूर स्वाऱ्यांसह सरदार, जहांगीरदार, मानकरी यांसह प्रशासकीय अधिकारी, समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी यांच्या बैठक व्यवस्थेसाठी मैदानाच्या पश्चिम व उत्तर बाजूस मंडप (शामियाना) उभारण्यात आला होता. पावसामुळे दसरा मैदानावर ठिकठिकाणी चिखल झाल्याने मुरुम, वाळू, खडीचा वापर करण्यात आला आहे.

हिल रायडर्सचे नगारखान्यास तोरण विजयादशमी

दसरा सणानिमित्त हिल रायडर्स ग्रुपतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे जुना राजवाड्याच्या नगारखाना या मुख्य प्रवेशद्वारास तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. यंदा उपक्रमाचे ३५ वे वर्ष आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम पार पडला. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, आपला शौर्यशाली इतिहास आजच्या युवा पिढीला माहिती व्हावा, कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article