कोळी समाजाकडून आंदोलन अद्याप सुरूच:जात प्रमाणपत्र घेऊन मागे हटण्याचा पवित्रा, प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आराेप‎

3 hours ago 2
मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर २० जानेवारीपासून कोळी समाजाला टोकरे कोळी संवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून बेमुदत उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी भेट देत दोन दिवसांत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले. परंतु चार दिवस उलटूनही निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत जात प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार, शिवाय २६ जानेवारीला काळ्याफिती लावून प्रशासनाचा निषेध करणार असल्याचेही उपोषणकर्ते नितीन कांडेलकर यांनी सांगितले. भुसावळ उपविभागीय प्रांत कार्यालयामार्फत यादी तालुक्यातील कोळी बांधवांना टोकरे कोळी संवर्गाचे दाखले जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यानंतर काही बांधवांनी अर्ज सादर केले, त्याला सबळ पुरावेही जोडले आहे. एकाच घरातील एका व्यक्तीला प्रमाणपत्र दिले व परिवारातील जात प्रमाणपत्राचे अर्ज नाकारले जात आहे. २६ जानेवारीच्या आत जात प्रमाणपत्र प्रांत अधिकाऱ्यांनी न दिल्यास २६ जानेवारीला काळ्या फित लावून प्रशासनाचा निषेध करण्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा उपोषणकर्ते नितीन कांडेलकर यांनी दिला. यावेळी वढोद्याचे सरपंच संदीप खिरोळकर, पांडुरंग बावस्कर, दिनकर कोळी, गुणवंत पिवटे, योगेश झाल्टे, राजू कांडेलकर व समाधान कांडेलकर हे उपस्थित होते. याच माग‌ण्यांसाठी ५ सप्टेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालयासमोर २१ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी प्रांत जितेंद्र पाटील यांनी आश्वासन देऊन १० टक्के जातीचे प्रमाणपत्र दिले. उर्वरित प्रकरणांसाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. त्या प्रस्तावांना सबळ पुरावे जोडले असूनही ते नाकारले. प्रलंबित प्रकरणांसाठी दुसऱ्यांदा कोळी बांधवांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article