खिर्डी बुद्रुकला रात्री 8.20 वाजता झाले शेवटचे मतदान:तरीही उत्साह, गावात एकूण 68 टक्के मतदान, सर्व पक्षांचा दावा आपल्याकडेच कल
6 hours ago
1
खिर्डी बुद्रुक (ता.रावेर) हे गाव मुक्ताईनगर विधानसभेत येते. येथे ३१७२ पैकी ६८ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच तिन्ही बूथवरील मतदारांमध्ये उत्साह होता. शेवटचे मतदान रात्री ८.२० वाजता झाले. दरम्यान, सहायक स्वयंसेवक नसल्याने दिव्यांग बांधवांचे हाल झाले. खिर्डी बुद्रुकला एकूण तीन बूथ होते. त्यात बूथ क्रमांक ३५ मध्ये १०३४ पैकी ६४५, बूथ क्र.३६ मध्ये १०५८ पैकी ८१२, बूथ क्र.३७ मध्ये १२४६ पैकी ८३३ मतदान झाले. एकूण ६८ % मतदान झाले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे व सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला. दरम्यान, केंद्रांवर दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी व्हीलचेअरची व्यवस्था होती. पण, सायकल लोटून नेण्यासाठी स्वयंसेवक नव्हते. निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करूनही दिव्यांग मतदाराला ताटकळत थांबावे लागले. याबाबत नाराजी व्यक्त करत त्याने नंतर तहसीलदारांकडे संपर्क साधला. नंतर पोलिसांनी मदत केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)