गडचिरोली येथे अमेरिकन सरकारच्या विरोधात काँग्रेसने निदर्शने केली. Pudhari Photo
Published on
:
08 Feb 2025, 10:42 am
Updated on
:
08 Feb 2025, 10:42 am
गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : अमेरिकन सरकारने तेथील भारतीय नागरिकांना अत्यंत अपमानास्पद स्थितीत भारतात पाठविल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज (दि.८) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत निदर्शने केली. (Gadchiroli Congress Protests)
यावेळी कार्यकर्त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, घनश्याम वाढई, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. विश्वजित कोवासे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, मिलिंद खोब्रागडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.