गणोजातील महालक्ष्मी मंदिराला झळाळी!:कोल्हापूरच्या देवीचे प्रतिरूप असलेल्या मंदिरात नवरात्रोत्सव

2 hours ago 1
येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र गणोजादेवी येथे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे प्रतिरूप आहे. या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, हे मंदिर रंगबिरंगी प्रकाशाने न्हाऊन निघाले. भाविकांची येथे दररोज गर्दी वाढत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवीला दागदागिने चढवण्यात आलेत. यादरम्यान श्रीमद भागवत कथेसह अष्टमीला सकाळी महाआरती, होमहवन इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी ही त्यापैकी एक पूर्ण पीठ आहे. या देवीच्या मूर्तीची प्रतिरूप मूर्ती येथे आहे. मूर्तिसाम्यामुळे येथील देवीला ‘करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी’ म्हणून भाविक संबोधतात. गणोजा येथील मंदिरातील मूर्ती अखंड काळ्या पाषाणाची असून ती ‘स्वयंभू’ आहे. मूर्तीची उंची सव्वादोन फूट आहे. ती सिंहावर आरूढ असून चतुर्भुज आहे. देवीच्या हातात त्रिशूल, ढाल, गदा व पद्य आहे. मस्तकावर मुकुट आहे. गणोरी गावचे गणू भटजी हे कोल्हापूरच्या देवीचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी नवरात्रोत्सवात कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला अनवाणी (पायी) जात असत. त्यांच्या या वारीत कधीच खंड पडला नाही. वृद्धापकाळ आल्याने एका वारीला ते मंदिराच्या परिसरात बसले. पुढल्या वर्षी देवीचे दर्शन होणार { उर्वरित. पान ४ ४०० वर्षांपासूनची परंपरा सुमारे ४०० वर्षांपूर्वी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मुहूर्तावर शेकडो भाविकांच्या साक्षीने या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे यात्रोत्सव असतो. दहा दिवस महोत्सवात तीर्थस्थापना, अखंड वीणावादन, षोडशोपचार पूजा, अभिषेक, कीर्तन, महाप्रसादासह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. याशिवाय आश्विन शुद्ध प्रतिपदेला मंदिरात घटस्थापना केली जाते. धार्मिक विधीने कलशपूजन करून दीप देवतेची पूजा करून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्र व मार्गशीर्ष महिन्यातील यात्रोत्सवादरम्यान देवीला सोन्याचा अलंकृत मुखवटा व मढवलेले दागदागिने चढवतात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article