गतवर्षीच्या तुलनेत अहिल्यानगरचा पारा 4 अंशांनी घसरला:गेल्यावर्षी होते 15 अंश तापमान यंदा गेले 11 अंशावर, दूध व उबदार कपड्यांना मागणी वाढली
1 hour ago
1
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा कडाका वाढला आहे. नोव्हेंबर महिन्यात मागील वर्षी (२०२३) किमान तापमान १४ ते १५ अंशावर होते. यंदा मात्र, याच महिन्यात तापमानाचा पारा दहा ते अकरा अंशापर्यत घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गारवा वाढला आहे. वाढलेल्या गारव्यासोबत दुधालाही मागणी वाढली आहे. तसे हे दूध कोणत्याही ऋतूत पिणे फायदेशीर असते, परंतु हिवाळ्यात प्यायल्याने जास्त फायदा होतो. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बहुतांश धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहिले. १५ ऑक्टोबरनंतर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आठ दिवस ऑक्टोबर हिटचा सामना जिल्ह्याने केला. १ नोव्हेंबरपासून मात्र, अचानक थंडीचा कडाका वाढल्याचे पहायला मिळाले. उत्तर भारतात ताशी २० ते २५ किमी वेगाने थंड वारे वाहात असल्याने महाराष्ट्रातही थंडीची लाट अनुभवास येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गुरूवारी ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यानंतर शुक्रवारी त्यात दीड अंशाची वाढ होऊन, तापमान ११ अंशापर्यंत पोहोचले. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातील तापमानाचा आढावा घेतला असता, यंदा थंडी कडाका अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये ६ तारखेला तापमान १४ अंशापर्यंत घसरले होते. त्यानंतर २६ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मात्र, किमान १७ ते १८ अंश तर कमाल ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात उबदार कपड्यांच्या विक्रीचे स्टॉल लागले आहेत. तेथे गर्दी वाढली आहे. दरम्यान, शरीर उबदार राहण्यासाठी दुधालाही मागणी वाढली आहे. आल्याच्या दुधाचे सेवन केल्याने आपले शरीर उबदार राहते. ज्यामुळे हंगामी आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, तसेच पचनशक्तीही निरोगी राहते. हिवाळ्यात दूध आरोग्याला फायदेशीर ^ हिवाळ्यात दुधात थोडे आले घालून थोडा वेळ उकळून, ते दूध प्यावे. त्यामुळे दुधाला चांगली चव तर येतेच, पण आरोग्यासाठीही ते खूप फायद्याचे आहे. रोज आल्याच्या दुधाचे सेवन केल्याने आपले शरीर उबदार राहते. शिवाय हंगामी आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. तसेच आपली पचनशक्ती निरोगी राहते. - नम्रता मकासरे, आहारतज्ज्ञ
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)